हा लक्षचंडी महायाग पूर्णपणे विनामूल्य आहे. यासाठी केंद्र कोणतेही शुल्क, आकारत नाही. तरी भक्तांनी कोणत्याही चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.
लक्षचंडी याग २०२६
हा लक्षचंडी महायाग पूर्णपणे विनामूल्य आहे. यासाठी केंद्र कोणतेही शुल्क, आकारत नाही. तरी भक्तांनी कोणत्याही चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.
सर्व भक्तांनी दिलेल्या वेळेच्या १ तास आधी उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
यागासाठी बसणाऱ्या पुरुष सेवेकऱ्यांसाठी सोवळे अनिवार्य आहे. तसेच, सोवळे बदलण्यासाठी स्वतंत्र सोय/व्यवस्था करण्यात आली आहे.
यागासाठी बसणाऱ्या महिला सेवेकऱ्यांनी खालील नमूद केलेल्या रंगांच्या साड्या व हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान करणे अनिवार्य आहे.
• 19-02-2026: पिवळी साडी
• 20-02-2026: लाल साडी
• 21-02-2026: हिरवी साडी
काळ्या रंगाच्या वस्तू व वस्त्रे (उदा. बांगड्या, हेअर पिन, क्लचर), कोणीही परिधान करू नयेत.तसेच चामड्याच्या वस्तू (उदा. पर्स, बेल्ट, पाकीट) कोणीही आणू नयेत.
आपली नोंदणी शोधण्यासाठी आपले नाव (मराठी/इंग्लिश) किंवा नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरावा.
जुना स्क्रीनशॉट ग्राह्य धरला जाणार नाही. जेव्हा तुम्हाला केंद्राकडून व्हॉट्सॲपवर अधिकृत मेसेज (WhatsApp Message) मिळेल, त्यानंतरच वेबसाईटवर पुन्हा माहिती बघून नवीन आणि अंतिम कुंड क्रमांकाचा स्क्रीनशॉट (जो की वेगळ्या रंगाचा असेल) काढावा,व तो केंद्रावर आल्यावर दाखवावा.
आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी स्वतः घ्यावी.